FD rates: रिझर्व्ह बँकेनं (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यामुळे सर्वच बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलंय किंवा कमी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, एफडीवर मोठं व्याज मिळण्याची संधी संपलेली नाही. जर तुम्ही जर अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली आणि एफडीचा कालावधी निवडला तर तुम्हाला सहज चांगलं व्याज मिळू शकतं. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या बँकेच्या किती कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळत आहे.
State Bank of India (SBI): देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक सर्वसामान्य नागरिकांना २ वर्षे ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ६.७०% दरानं व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी ७.२० टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे.
HDFC Bank: खासगी क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँक अजूनही १५ ते १८ महिन्यांच्या कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात व्याज देत आहे. या कालावधीसाठी बँक सर्वसामान्यांना ६.८५ टक्के दरानं व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.३५ टक्के आहे.
हेही वाचा - २१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
ICICI Bank: खासगी क्षेत्रातील ही बँक १८ महिने ते २ वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याज देत आहे. या कालावधीसाठी बँक सर्वसामान्यांना ६.८५ टक्के दरानं व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी ७.३५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे.
Bank of Baroda: सरकारी बँक ऑफ बडोदा १ वर्षाच्या एफडीवर चांगला परतावा देत आहे. बँक सर्वसामान्य नागरिकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.७० टक्के दरानं व्याज देतेय. त्याचबरोबर या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे.
PNB: पंजाब नॅशनल बँक अजूनही १ वर्षाच्या एफडीवर चांगला परतावा देत आहे. बँक सर्वसामान्य नागरिकांना १ वर्षाच्या एफडीवर ६.७० टक्के दरानं व्याज देतेय. तर ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिक अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.५० टक्के दरानं व्याज दिलं जातंय.