Bank Holidays in January 2026 : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये बँकांच्या कामकाजावर सुट्ट्यांचा मोठा परिणाम होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, जानेवारी महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवार या व्यतिरिक्त विविध सण आणि राष्ट्रीय उत्सवांमुळे एकूण १६ दिवस बँका बंद राहतील. यामध्ये मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या सुट्ट्या आणि सणजानेवारी महिन्यात काही सुट्ट्या संपूर्ण देशात लागू असतील, तर काही सुट्ट्या प्रादेशिक महत्त्वामुळे ठराविक राज्यांपुरत्या मर्यादित आहेत. महाराष्ट्राचा विचार करता २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी राज्यातील सर्व बँका बंद राहतील.
प्रमुख सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे
- १ जानेवारी : नवीन वर्ष (काही उत्तर-पूर्व राज्यांमध्ये सुट्टी)
- २ जानेवारी : नवीन वर्ष उत्सव/मन्नम जयंती (कोची, तिरुवनंतपुरम)
- १२ जानेवारी : स्वामी विवेकानंद जयंती (कोलकाता)
- १४ जानेवारी : मकर संक्रांती/माघ बिहू (अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी)
- १५ जानेवारी : पोंगल/उत्तरायण (बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद)
- २३ जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती/वसंत पंचमी (कोलकाता, भुवनेश्वर)
- २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन (देशभर सुट्टी - मुंबई, नागपूरसह सर्व प्रमुख शहरे)
शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याबँकेच्या नियमित नियमांनुसार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बँकांचे कामकाज बंद राहील.रविवार : ४, ११, १८ आणि २५ जानेवारी.शनिवार : १० जानेवारी (दुसरा शनिवार) आणि २४ जानेवारी (चौथा शनिवार).
शेअर बाजारात ९ दिवस 'नो ट्रेडिंग'बँकांसोबतच गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराच्या सुट्ट्यांचीही नोंद घेणे आवश्यक आहे. बीएसईने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एकूण ९ दिवस ट्रेडिंग बंद राहील. यामध्ये ८ साप्ताहिक सुट्ट्या (शनिवार-रविवार) आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सुट्टीचा समावेश आहे.
ऑनलाइन बँकिंग राहणार सुरूबँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ऑनलाइन बँकिंग सेवा आणि ATM चोवीस तास सुरू राहतील. मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही पैशांचे व्यवहार सहज करू शकाल.
Web Summary : Banks will be closed for 16 days in January 2026 due to Sundays, Saturdays, festivals like Makar Sankranti, and Republic Day. Online banking and ATMs will remain operational. Share market trading will be closed for 9 days.
Web Summary : जनवरी 2026 में रविवार, शनिवार, मकर संक्रांति और गणतंत्र दिवस जैसे त्योहारों के कारण बैंक 16 दिनों के लिए बंद रहेंगे। ऑनलाइन बैंकिंग और एटीएम चालू रहेंगे। शेयर बाजार में 9 दिन ट्रेडिंग बंद रहेगी।