Cheque Bounce Rules: आजच्या काळात पेमेंट करण्यासाठी बहुतेक लोक UPI चा वापर करत आहेत, परंतु तरीही चेकद्वारे होणारे पेमेंट कमी झालेले नाही. आजही अनेक लोक मोठ्या रक्कमेच्या व्यवहारांसाठी चेकलाच सुरक्षित मानतात आणि त्याचाच वापर करतात. मात्र, अनेकदा चेक पेमेंट करताना 'चेक बाऊन्स' होतो, म्हणजेच पेमेंट अयशस्वी ठरतं. अनेक लोक चेक बाऊन्स होणं किंवा ऑटो-डेबिट फेल होणं ही एक छोटी चूक मानतात, परंतु याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. विशेषतः चेक बाऊन्सचे प्रकरण केवळ बँक चार्जेसपुरते मर्यादित न राहता कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचू शकतं.
चेक बाऊन्स संदर्भातील कायदेशीर नियम
नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ नुसार, जर एखादा चेक बाऊन्स झाला आणि १५ दिवसांच्या आत त्याचं पेमेंट केलं गेलं नाही, तर संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत २ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, हा नियम केवळ चेक बाऊन्सवर लागू होतो.
चीनच्या हाती 'या' कुलुपाची चावी, देऊ शकतो दगा; ४ देशांसोबत भारत शोधतोय पर्याय, बाजी पलटणार?
ऑटो-डेबिट किंवा NACH फेल झाल्यास सामान्यतः फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, परंतु आर्थिक नुकसान नक्कीच होते. जेव्हा चेक किंवा NACH फेल होतं, तेव्हा बँक प्रत्येक वेळी २५० ते ७५० रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकते. याशिवाय, जर तुमचा EMI, भाडं किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट फेल झालं असेल, तर लेंडर्स स्वतंत्रपणे लेट फी, बाऊन्स चार्ज आणि व्याज देखील वसूल करू शकतो.
क्रेडिट स्कोरवर होणारा परिणाम
पेमेंट फेल होण्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होतो. EMI किंवा क्रेडिट कार्डचं पेमेंट वेळेवर न केल्यास तुमचा स्कोर ५० ते ७० अंकांनी घसरू शकतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात. तसंच, सतत पेमेंट फेल झाल्यामुळे लोन रिस्ट्रक्चरिंग करण्यात अडचण, भविष्यातील कर्जावर जास्त व्याज आणि होम लोनसारख्या मोठ्या कर्जासाठीची पात्रता कमी होणं अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
चेक बाऊन्स होण्याची मुख्य कारणं
बहुतेक लोकांना वाटतं की केवळ बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळेच चेक बाऊन्स होतो, परंतु याची इतरही अनेक कारणं असू शकतात. यामध्ये चुकीचे बँक तपशील, खात्याची ऑटो-डेबिट मर्यादा कमी असणं, NACH/ECS नेटवर्क फेल होणं, बँकेच्या सिस्टममधील तांत्रिक त्रुटी किंवा खाते बंद असणं अथवा बदलणं अशा कारणांमुळेही अनेकदा चेक बाऊन्स होऊ शकतो.
Web Summary : Cheque bounce can lead to a 2-year jail term and penalties. Insufficient funds or technical issues are common causes. Auto-debit failures also incur charges and impact credit scores, potentially hindering future loan eligibility.
Web Summary : चेक बाउंस होने पर 2 साल तक की जेल और जुर्माना हो सकता है। अपर्याप्त धन या तकनीकी समस्याएँ सामान्य कारण हैं। ऑटो-डेबिट विफलताएं भी शुल्क लगाती हैं और क्रेडिट स्कोर को प्रभावित करती हैं, जिससे भविष्य में ऋण पात्रता बाधित हो सकती है।