Join us

बँक ग्राहकांनो लक्ष द्या; तात्काळ करा 'हे' काम, अन्यथा बसेल दंड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 18:34 IST

Banking Rule News: प्रत्येक बँकेचा खात्यात किमान रक्कम ठेवण्याचा नियम आहे.

Banking Rule News: भारतातील बहुतांश लोकांचे कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते आहे. सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट, असे दोन प्रमुख अकाउंटचे प्रकार आहेत. आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून अनेकजण सेव्हिंग अकाउंट ओपन करतात. करंट अकाउंटमध्ये किमान पैसे ठेवण्याची मर्यादा नाही, पण सेव्हिंग अकाउंटमध्ये एक ठराविक रक्कम ठेवावीच लागते. अन्यथा तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. ही मर्यादा प्रत्येक बँकेची वेगवेगळी आहे.

SBI सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) मध्ये बहुतांश लोकांचे अकाउंट आहे. या बँकेवर लोकांचा विश्वास जास्त आहे. मार्च 2020 मध्ये बँकेने अकाउंटमध्ये किमान रक्कम ठेवण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यापूर्वी SBI खातेधारकांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये, दोन हजार रुपये किंवा एक हजार रुपये शिल्लक ठेवावे लागत होते. आता एसबीआयमध्ये झिरो बॅलेन्स अकाउंट ओपन करता येते.

HDFC एचडीएफसी बँकेच्या खात्यात किमान रक्कम ठेवणे गरजेचे आहे. शहरी भागातील शाखांसाठी किमान रक्कम 10 हजार रुपये किंवा 1 लाख रुपयांची एफडी किंवा पाच हजार रुपयांची सरासरी मासिक शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. तर निमशहरी शाखेसाठी तीन महिन्यांसाठी 2500 रुपये आहे.

ICICI ICICI बँकेतील नियमित बचत खात्यासाठी किमान रक्कम 10 हजार रुपये आणि सेमी-अर्बन शाखांसाठी पाच हजार रुपये तर ग्रामीण भागातील शाखांसाठी दोन हजार रुपये आहेत. याशिवाय, कॅनरा बँकेसाठी दोन हजार रुपये, निमशहरी भागासाठी एक हजार आणि ग्रामीण भागासाठी 500 रुपये आहे. 

टॅग्स :बँकएसबीआयएचडीएफसीआयसीआयसीआय बँक