Join us  

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे करवा चौथ या सणासोबत आहे हे खास नाते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 6:01 PM

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील चाँद छुपा बादल में हे गाणे रसिकांचे प्रचंड आवडते आहे. हे गाणे करवा चौथच्या सणावर असून या गाण्यात आपल्याला सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळते.

आज करवा चौथ असून अनेक पत्नींनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केलेला आहे. आजकाल अनेक पती देखील आपल्या पत्नीसोबत उपवास करताना दिसतात. करवा चौथच्या निमित्ताने बायका हातावर मेहेंदी काढतात. एखाद्या नववधूप्रमाणेच त्या सजतात. आजपर्यंत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला करवा चौथ हा सण पाहायला मिळाला आहे. करवा चौथ आणि बॉलिवूड यांचे खूपच जवळचे नाते आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पण तुम्हाला माहीत आहे का एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या प्रियकरासाठी लग्नाच्या आधी करवा चौथचा उपवास ठेवला होता. या अभिनेत्रीचा प्रियकर देखील बॉलिवूडमधील एक सुपरस्टार आहे. पण हा उपवास काही खऱ्या आयुष्यातील नसून एका चित्रपटासाठी ठेवला होता. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाचा हा उल्लेख असून या चित्रपटात नंदिनी (ऐश्वर्या) समीर (सलमान) साठी उपवास ठेवते असे दाखवण्यात आलेले होते.  

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील चाँद छुपा बादल में हे गाणे रसिकांचे प्रचंड आवडते आहे. हे गाणे करवा चौथच्या सणावर असून या गाण्यात आपल्याला सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळते. या चित्रपटात समीर (सलमान) आणि नंदिनी (ऐश्वर्या)  यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम असते. त्या दोघांनी एकत्र राहाण्याची स्वप्नं पाहिलेली असतात. त्या दोघांच्या लग्नाच्या आधीच ऐश्वर्या त्याच्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवते. त्यांच्या प्रेमाला दर्शवणारे हे चांद छुपा हे गाणे, त्याचे बोल आजही रसिकांच्या हृदयाला स्पर्श करतात. 

सलमान आणि ऐश्वर्या या दोघांची हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील केमिस्ट्री खूप चांगली जुळून येण्यामागे एक खास कारण होते. कारण या चित्रपटाच्या वेळी त्या दोघांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा मीडियात रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांची रिअल लाइफमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना रिल लाइफमध्ये देखील पाहायला मिळाली होती.  

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन