Join us

उन्हाळी पिके वाचविण्यासाठी विष्णुपुरीचे पाणी कधी सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 3:00 PM

अनियमित पाणी आवर्तनामुळे लोहा तालुक्यातील मारतळा परिसरातील २० खेडी व वाडी तांड्यातील रब्बी व उन्हाळी हंगामातील विविध पिके धोक्यात आली आहे.

विष्णूपुरी प्रकल्पातील पाणी हे कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला मिळावे अशी अपेक्षा असताना या प्रकल्पातील पाण्याच्या अनियमित पाणी आवर्तनामुळे लोहा तालुक्यातील मारतळा परिसरातील २० खेडी व वाडी तांड्यातील रब्बी व उन्हाळी हंगामातील विविध पिके धोक्यात आली आहे. प्रकल्पाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

किवळा लाभक्षेत्रात येणाऱ्या उमरा, वाका, जोमेगाव, पिंपळदरी, करमाळा, लोंढे सांगवी, जोशी सांगवी, कांजाळा,तांडा, डोलारा, मोकलेवाडी, गोळेगाव, शिराढोण, उस्मान नगर, आदी गावच्या शेतीला पाणी आवर्तन दिले जाते.तीन पैकी दोनच आवर्तन मिळाले.

■ भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. यावर्षी तीन पाणी आवर्तन मिळतील या अपेक्षेपोटी रब्बी व उन्हाळी हंगामातील चारा वर्गीय पिकांसह विविध पिकांचा पेरा केला.

मात्र प्रत्यक्षात उपरोक्त भागात केवळ दोनच पाणी आवर्तन फिरले. दोन्ही हंगामातील पेरलेली पिके वाचवण्यासाठी विष्णुपुरी प्रकल्पाचे तिसरे पाणी आवर्तन मिळावे ही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :धरणपाणीविष्णुपुरी धरण