Join us

Hailstorm काय सांगताय? या गावात पडली तब्बल सात किलोची गार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 4:26 PM

वीरवाडी येथील शाहीर सुरेश पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पत्र्यावर अजस्त्र गार आदळली. एवढा मोठा आवाज कशाचा म्हणून घरातील लोक जाऊन बघतात तर काय परातीएवढी मोठी अजस्त्र गार.

बिळाशी (ता. शिराळा) येथे गेले चार दिवस सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस कोसळत होता. ढगफुटीसदृश्य या पावसाने ओढे-नाले वाहू लागले.

याच दरम्यान वीरवाडी येथील शाहीर सुरेश पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पत्र्यावर अजस्त्र गार आदळली. एवढा मोठा आवाज कशाचा म्हणून घरातील लोक जाऊन बघतात तर काय परातीएवढी मोठी अजस्त्र गार. ही गार बघताच उचलून त्यांनी परातीत ठेवली. एवढी मोठी गार पडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यावेळी सुरेश पाटील म्हणाले, माझ्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात ही अशी मोठी गार मी पहिल्यांदा पाहिली ही गार घराच्या छपरावर पडली असती तर छप्पर फोडून ती गार घरात आली असती, परंतु सुदैवाने सदरची गार पाठीमागे उघड्या परड्यात पत्र्यावर आदळली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सात किलो वजनाची गारसुमारे सहा ते सात किलो वजनाची बर्फाची लादी असेल एवढ्या आकाराची ही गार होती. पाऊस थांबल्यानंतर बराच वेळ ही गार पाहण्यासाठी लोक येत होते. तासाभराने ही गार विरघळून गेली. परंतु या गारीची परिसरात चर्चा सुरू आहे.

अधिक वाचा: Rain Indicator Tree हे झाड देतं पावसाच्या आगमनाचे संकेत

टॅग्स :गारपीटहवामानपाऊसशिराळा