Join us

विदर्भ व कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 20, 2023 17:37 IST

राज्यात विदर्भ व कोकणपट्ट्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 20 ते 22 सप्टेंबर पर्यंत ...

राज्यात विदर्भ व कोकणपट्ट्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 20 ते 22 सप्टेंबर पर्यंत विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिम भागात झुकला असून समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटरवर चक्राकार वारे वाहत आहेत. २० ते २६ सप्टेंबर दरम्यान कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता असून विदर्भात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्ज मिळणे झाले सोपे, सवलत थेट खात्यात जमा

दरम्यान , आज कोकण व विदर्भ विभागातील 14 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 45 ते 55 किलोमीटर प्रति तास राहणार असून काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भंडारदरा १००% गंगापूर ९७ %; आज असा आहे राज्यातील धरणांचा पाणीसाठा       

भारतीय हवामान विभागाचे पुण्यातील प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून हवामान अंदाज वर्तवला आहे. 

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1704446964543455385कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

विदर्भ- बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा 

कोकण- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

कांदा उत्पादक संघटनेचा मोठा निर्णय; दिवाळीपासून सुरू करणार स्वत:ची कांदा विक्री केंद्रे

पुढील दोन दिवस पावसाची स्थिती काय?

21 व 22 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार असून गुरुवारी (२१) विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारी (२२)  राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून २३ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज