Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात मोठा हिमखंड जागचा हलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 16:00 IST

पर्यावरणासाठी हा हिमखंड अत्यंत महत्वाचा...

तब्बल ३० वर्षे समुद्राच्या पाण्यावर नुसताच तरंगत असलेला महाकाय हिमखंड आता हळूहळू पुढे सरकायला लागला आहे. वेगाने मार्गक्रमण करीत 'ए २३ ए' नावाचा हा हिमखंड अंटार्क्टिकापासून लांब जात आहे. ब्रिटिश अंटार्क्टिका सर्व्हेचे रिमोट सेंसिंग तज्ज्ञ डॉ. अॅण्ड्रयू फ्लेमिंग यांनी सांगितले की, चार दशकांआधी हा हिमखंड स्थिर झाला होता. तथापि, त्याचा आकार कमी झाल्याने त्याची पकड सैल होऊन तो हलायला लागला.

तीन वर्षांआधी त्याची हालचाल बघितली. तापमानामुळे ही हालचाल असेल, असे आधी वाटले होते. मात्र, तो पुढे जात असल्याचे लक्षात आले. शास्त्रज्ञांनी शुक्रवारी सांगितले की, जगातील सर्वात मोठा हिमखंड तीन दशकांहून अधिक काळात प्रथमच पुढे जात आहे. 

पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा

  • ध्रुवीय क्षेत्रातील हिमखंड संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अमेरिकेच्या वुड्स होल ओशिनोग्राफिक इन्स्टिट्यूशनच्या डॉ. कॅशरीन वॉकर यांच्यानुसार, अनेक अर्थाने हे हिमखंड जीवनदाते आहेत. 
  • अनेक जैविक हालचालींचे मूळ त्यांच्या अस्तित्वात आढळते. हिमखंड वितळल्यानंतर ते खनिज धूळ सोडतात ज्यामुळे सागरी खाद्य श्रृंखलेवर अवलंबून असलेल्या जीवांचे पोषण करतात. 

कुठे चाललाय पर्वत?

'ए २३ ए' कदाचित दक्षिण अटलांटिक समुद्राकडे जाण्याची शक्यता आहे. दक्षिण जॉर्जिया बेटावर प्रजनन करणाऱ्या लाखो सील, पेंग्विन आणि इतर समुद्री पक्ष्यांच्या आहारात तो हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याने शास्त्रज्ञ त्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

गती कशामुळे?

  • ए २३ ए'च्या सरकण्याची गती अलीकडेच पाण्याच्या हिंदोळ्यांत आलेली गती आणि वाऱ्याचा वेग यामुळे वाढलेली दिसते.
  • सध्या हा हिमखंड अंटार्क्टिकाच्या प्रायद्वीपाच्या उत्तरेकडील भागाकडून मार्गक्रमण करीत आहे.
  • सामान्य बोलीभाषेत ज्याचा उल्लेख 'हिमशैल पथ' असा करण्यात येतो, त्या अंटार्क्टिका सर्कम्पोलर करंटमध्ये 'ए २३ ए' सामावण्याची शक्यता आहे.
  • 'ए २३ ए' कदाचित दक्षिण अटलांटिक समुद्राकडे जाण्याची शक्यता आहे. दक्षिण जॉर्जिया बेटावर प्रजनन करणाऱ्या लाखो सील, पेंग्विन आणि इतर समुद्री पक्ष्यांच्या आहारात तो हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याने शास्त्रज्ञ त्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
टॅग्स :हवामानतापमान