Join us

लाही लाही होणार कमी! मराठवाड्यात पुढील तीन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Updated: October 13, 2023 17:00 IST

हलक्या पावसाची शक्यता...

राज्यातून अखेर पावसाने परतीची वाटचाल सुरू केल्याचे नुकतेच हवामान विभागाने वर्तवले आहे. दरम्यान ऑक्टोबर हीटचा परिणाम अधिक जाणवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात वाढलेले तापमान आता दोन ते तीन दिवसात कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडयात पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढली तीन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली.दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी उत्तर मराठवाडयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर दिनांक 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार  दिनांक 18 ते 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

टॅग्स :हवामानमोसमी पाऊसपाऊस