Join us

Rain Updates : राज्यभरातील विविध ठिकाणी भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 6:44 PM

एकीकडे उन्हाचा चटका तर दुसरीकडे अवकाळीच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहेत.

पुणे :  सध्या राज्यभर पावसाचे वातावरण असून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. भर उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती असून शेतपिकांचे नुकसान होत आहे. मागच्या तीन आठवड्यापासून ही परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे उन्हाळी पिक काढणीचे कामे अडले असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. 

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भानंतर अवकाळी पावसाने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नगर, सोलापूर, पुणे, सातारा, नाशिक परिसरातील काही भागांत पाऊस पडत असून पावसाच्या या वातावरणामुळे उन्हाळी पिके शेतात असलेले शेतकरी चिंतेत आहेत. 

विदर्भातील बुलढाणा आणि पूर्व महाराष्ट्रातील पट्ट्यामध्ये मागच्या तीन आठवड्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे घरावरील पत्रेही उडून गेले होते. यामध्ये घरात साठवून ठेवलेल्या कापसाचे आणि धान्याचे नुकसान झाले होते. 

पाराही वाढलाएकीकडे उन्हाचा वाढता पारा आणि दुसरीकडे अवकाळीचा फटका असे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, अकोला, वाशिम येथे तापमान हे ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तर राज्यातील अनेक ठिकाणी पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे.

३० एप्रिलपर्यंत पावसाची शक्यताराज्यात असलेले ढगाळ वातावरण हे येणाऱ्या ३० एप्रिलपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामाना विभागाने वर्तवला आहे. अजून तीन दिवस राज्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजेंच्या गडगडाटासह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणामध्ये या पावसाचा जास्त फटका बसणार नसल्याचंही अंदाजात सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपाऊस