Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rain Maharashtra: पुढील तीन दिवस राज्यात कसे राहणार हवामान? या जिल्ह्यांत तुफान, इथे केवळ हलक्या सरी

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 20, 2024 10:04 IST

हवामान विभागाने काय सांगितलं? जाणून घ्या सविस्तर

राज्यात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी पुढील तीन दिवस कोकणपटट्यात तुफान पावसाची शक्यता देण्यात आली असून विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित भागात हलक्यात ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या सरींचा पाऊस राहणार असून उत्तर महाराष्ट्रातही पावसाने ओढ दिली असून हलक्या पावसाची शक्यता आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात २० ते २२ पर्यंत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

आज पुण्यासह सातारा जिल्ह्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात मुसळधारांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊस