Join us

Rain in Maharashtra: महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचला म्हणजे खरंच पाऊस पडतो का? जाणूून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:01 IST

Rain in Maharashtra monsoon updates महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असून लवकरच तो सर्व राज्य व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान मॉन्सून पोहोचला म्हणजे पाऊस येतोच का? आला तर किती? अशा प्रश्नांची उत्तरे हवामान तज्ज्ञांकडून जाणून घेऊ यात.

मान्सून आला म्हणजे काय? ( Monsoon rain update) मान्सून पोहचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? असा प्रश्न एका शेतकऱ्याने विचारला. त्या अनुषंगाने मॉन्सून आणि पावसाच्या (rain) गणिताबद्दल जाणून घेऊ.

मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस झालाच पाहिजे,असे नाही. पण मान्सून पोहोचला म्हणजे मान्सूनच्या मूळ उगमापासून वि्षुववृत्तावर (दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरीलपेरू, कोलंबिया, ईक्वेडोर देशापासून) समुद्रावरून अंदाजे एकोणवीस(१९०००)हजार किलोमीटर अंतर कापून वाहत येणारे व ते तुमच्या गावापर्यंत बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांचा प्रचंड प्रवाह वातावरणीय प्रणालीद्वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वि्षुववृत्त समांतर वाहता झाला व त्या वाऱ्यांचा रस्ता मोकळा झाला, असेच समजावे.

म्हणून तर आपल्याकडे ४ महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्येकडून ईशान्यकडे वाहतात.

आता या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल, किंवा दमदार पणा असेल, तरच पाऊस होतो अन्यथा नाही. अर्थात ही बाष्प-ऊर्जा पावसाळी हंगामात कमी होते, भरली जाते.                       

 ऊर्जा कमी झाली तर फक्त मान्सूनी बाष्पयुक्त वारेच ही ऊर्जा पुन्हा भरू शकतात. म्हणून त्यासाठी मान्सून वारे तुमच्या गांवापर्यंत पोहोचणे गरजेचे असते.

म्हणून तर कधी असे होते कि मान्सून आला किंवा येऊन पुढे गेला तरी पाऊस होत नाही. मग शेतकरी गोंधळतात. त्यांना वाटतं हा काय प्रकार आहे? आला म्हणतात, अन् येथे तर चक्क उन्ह पडलीत? त्याचे उत्तर या ऊर्जेत आहे.

यंदा तशी परिस्थिती आली तर काळजी करू नका. कारण यंदा 'ला- निना ' आहे, त्यामुळे बाष्प-ऊर्जास्रोताची उपलब्धता भरपूर असेल. त्यामुळे मान्सून प्रवाहादरम्यान ऊर्जा कमी झाली तर निसर्ग आपोआप भरण्याची व्यवस्था करतो.

प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने, शेतकऱ्यांच्या संकल्पना स्पष्टता व प्रबोधनासाठीच हे विवेचन समजावे, ही विनंती.

माणिकराव खुळे ,हवामानतज्ज्ञ (से.नि.)भारतीय हवामान विभाग, पुणे

टॅग्स :पाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजशेती