Join us

Rain alert: मराठवाड्यात या दोन जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 06, 2024 2:00 PM

सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव मराठवाड्यावर सक्रीय आहे.

राज्यात तापमानाचा पारा वाढत असताना मराठवाड्यात आजपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा,  मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

सध्या मराठवाड्यावर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव सक्रीय झाल्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच विदर्भावर या वाऱ्यांची सक्रीयता विस्कळीत स्वरूपात असल्याने विदर्भातही पावसाची शक्यता आहे.

यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमराठवाडा