Join us

राज्यभर पावसाचा अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Updated: September 29, 2023 19:17 IST

हवामान विभागाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात मध्यम ते मुसळधार सरींनी हजेरी लावली. दरम्यान,  आज विदर्भ,कोकण,मध्य महाराष्ट्र व  मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून धुळे व नंदुरबार जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

शुक्रवार व शनिवारी राज्यभर मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी बहुतांश राज्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरण पाणलोटात पावसाची मोठी आवक झाली. मुंबई, पुणे,नाशिक, नगर, व विदर्भातील बहुतांश धरणे भरत आली आहेत. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी,लातूर,नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा,अकोला, गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया, नागपूर,वर्धा,यवतमाळ,वाशिम जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस येत असून अहमदनगर,सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामान