Join us

मराठवाड्यात पुढील ५ दिवस पावसाचे! या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता..

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 23, 2024 3:20 PM

कोणत्या दिवशी कुठे पावसाची शक्यता? जाणून घ्या...

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागत असून मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात चोवीस तासात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी शक्यता?

दिनांक 23 एप्रिल रोजी धाराशिव व लातूर जिल्हयात, 

दिनांक 24 एप्रिल रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव व लातूर जिल्हयात, 

दिनांक 25 एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमराठवाडातापमान