Join us
Daily Top 2Weekly Top 5

Marathwada Rain: पुढील चार दिवसांकरता मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 20, 2024 15:58 IST

प्रादेशिक हवामान केंद्रात

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र असताना पुढील चार दिवसांकरता मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा (Marathwada Rain Update) देण्यात आला आहे.

मराठवाड्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केल्याचे दिसून येत असताना पावसाने दडी मारल्याने अनेकांना पेरण्या वाया जाण्याची टांगती तलवार आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार उद्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवस मराठवाड्यात ..

२१ जून २०२४- नांदेड व हिंगोली

२२ जून २०२४- बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड

२३ जून २०२४- छ़त्रपती संभाजीनगर, जालना, बीड

२४ जून २०२४- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट राहणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून ताशी ४० ते ५० किमी प्रतितास वाहतील.

टॅग्स :पाऊसहवामानतापमानमोसमी पाऊस