Join us

Maharashtra weather Update: कोकणासह पुण्यात तुफान पावसाचा अलर्ट, विदर्भातही जोरदार; वाचा सविस्तर हवामान अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 19, 2024 09:50 IST

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा ब्रेक, वाचा सविस्तर हवामान अंदाज

राज्यात मान्सूनला सुरुवात होताच पावसाने ओढ दिल्याचे चित्र दिसून येत असून मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह मराठवाड्यात पावसाने ‘ब्रेक’ घेतला आहे.( Maharashtra Rain alert) दरम्यान, कोकणासह मुंबई, पुणे, साताऱ्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या इशान्य अरबी समुद्राला जोडून सौराष्ट्रापर्यंत असून बंगालच्या उपसागरात पश्चिममध्य भागात सक्रीय आहे. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

१९ ते २१ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता असून आज पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाचे,पुणे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी X माध्यमावर सांगितले.

https://x.com/Hosalikar_KS/status/1803098615566745750

आज कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

आज संपूर्ण विदर्भाला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ४५ ते ५० किमी प्रतितास राहणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस राहण्याची शक्यता आहे.

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम, यवतमाळ

मध्य महाराष्ट्रात आज बहुतांश ठिकाणी हलक्या सरींच्या पावसाची शक्यता असून सातारा व पुणे जिल्ह्यास जोरदार पावसाचा अलर्ट आहे.

कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असून या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसतापमान