Join us

उद्या वातावरण निवळणार! थंडीची लागणार चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 8:10 PM

जाणून घ्या येणाऱ्या काळातील हवामान स्थिती

महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण उद्या गुरुवार दि.११ जानेवारी पासून निवळून हळूहळू पहाटेच्या किमान तापमानाचा पारा २ ते ३ डिग्रीने घसरून सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचेल. येत्या २-३ दिवसानंतर अजून खाली घसरण्याची शक्यता असून संक्रांती दरम्यान चांगली थंडी जाणवण्याची शक्यता जेष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

विशेषतः विदर्भात उद्यापासूनच चांगली थंडी पडू शकते. अर्थात सध्या लगेचच थंडीच्या लाटीची अपेक्षा नाही. एका मागे एक पश्चिमी झंजावात साखळी उत्तर भारतात सुरूच असून परवा १२ जानेवारीला मध्यम प. झंजावात वायव्येकडून प्रवेशित होवून आपल्याकडील येणाऱ्या अपेक्षित थंडीला पूरक ठरू शकते. दक्षिणेतील हिवाळी पावसाचा हंगाम आटोपण्याची शक्यता असताना अजूनही केरळ ता. राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्याचाच परिणामातून महाराष्ट्रात आता जसे दोन दिवस वातावरण बदलले. तसे वातावरणात बदल होत आहे. 

तीन आठवडे उलटले तरी दाट धुक्यापासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये अजून चालूच आहे. व अजूनही काही दिवस ही स्थिती राहू शकते. त्याचाच परिणाम आपल्याकडील खानदेशातील जिल्ह्यात होत आहे. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.) IMD Pune.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान