Cold Weather : आजपासुन नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देश मधील २६ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि. १५ नोव्हेंबर (लहान एकादशी, आळंदी यात्रे) पर्यंत सध्य:स्थितीत रात्री जाणवणारी थंडीसारखी थंडी जाणवेल, असे वाटते. जळगांवात तीव्र थंडीची लाट- जळगांवला आज पहाटे पाच वाजता ९.२ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन सरासरीपेक्षा ६.७ इतक्या अंश से. ने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची तीव्र लाट अनुभवली गेली. जळगांवचे दुपारी ३ चे कमाल तापमानही २९.७ अंश से. इतके नोंदवून सरासरीच्या ३.७ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे. त्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही हूड-हुडी जाणवली. थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती - महाराष्ट्रातील डहाणू नाशिक मालेगाव अहिल्यानगर जेऊर छ.सं.नगर बीड नांदेड ह्या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली. वातावरणीय बदल -रविवार दि. १६ नोव्हेंबर पासुन जर वातावरणीय काही बदल झाल्यास त्यावेळी अवगत केला जाईल.
- माणिकराव खुळे Meteorologist (Retd )IMD Pune.
Web Summary : Maharashtra braces for five days of cold weather. Jalgaon recorded a low of 9.2°C. Vidarbha and other districts are experiencing cold wave-like conditions. Further updates will be provided on November 16th, if weather changes.
Web Summary : महाराष्ट्र में अगले पांच दिनों तक ठंड का प्रकोप। जलगांव में 9.2 डिग्री सेल्सियस तापमान दर्ज किया गया। विदर्भ और अन्य जिलों में शीत लहर जैसी स्थिति। 16 नवंबर को मौसम बदलने पर आगे की जानकारी दी जाएगी।