Join us

Maharashtra Monsoon Update : राज्यात आज, उद्या कुठे-कुठे पडणार पाऊस? वाचा दोन दिवसांचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:10 IST

Maharashtra Monsoon Update : आता हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Update : राज्यातील बहुतांश भागात मान्सूनची (Monsoon) हजेरी लागली असून अद्यापही अनेक भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज वर्तविण्यात आले आहे. त्यानुसार आज व उद्या दक्षिण कोंकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात (maharashtra) बहुतेक ठिकाणी, उत्तर कोंकणासह मध्य व उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यातील (Marathwada) काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

११ जून रोजीचा म्हणजे आजचा हवामान अंदाज 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दक्षिण कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी व उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची (Rain Update) शक्यता आहे. यामध्ये पालघर, नाशिक, जळगाव, बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा (वेग ४०-५० कि मी प्रति तास) इशारा देण्यात आला आहे. 

तर रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना, मुसळधार पाऊस आणि वादळी वारा (वेग ४०-५० कि मी प्रति तास) इशारा देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक क्षेत्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस स्वरूपाच्या पाऊस होण्याची शक्यता आहे. 

१२ जून रोजीचा हवामान अंदाज 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या १२ जून रोजी दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी व उत्तर कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाउत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा (वेग ३०-४० कि मी प्रति तास) इशारा दिला आहे. 

त्यानंतर पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा (वेग ४०-५० कि मी प्रति तास) इशारा दिला आहे. तर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना, मुसळधार पाऊस आणि वादळी वारा (वेग ४०-५० कि मी प्रति तास) इशारा दिला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.  

टॅग्स :हवामानशेती क्षेत्रमोसमी पावसाचा अंदाजमोसमी पाऊस