Join us

Maharashtra Weather Update : थंडीचा प्रभाव कमी, दिवसा थंडावा तर रात्री ऊबदारपणा, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 20:07 IST

Maharashtra Weather Update : राज्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत असून दिवसा थंडावा तर रात्रीच्या वेळी उबदारपणा जाणवत आहे.

Maharashtra Weather Update : सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणात (Kokan Weather) दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एक डिग्रीने कमी तर पहाटेचे किमान एक डिग्रीने वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा आल्हाददायकपणा तर रात्री ऊबदारपणा (Climate Change) जाणवत असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने (Maharashtra Weather Update) बदल होत आहेत. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात परिस्थिती अशीच असली तरी पहाटेचे किमान तापमानातील वाढ ही अत्याधिक असल्यामुळे थंडीचा प्रभाव काल शनिवार दि.११ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात कमी झाला आहे. 

बंगालच्या उपसागराततून वारे महाराष्ट्रावर आर्द्रता आणत असल्यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव असाच कमी जाणवणार आहे.

सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यानच्या तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल, असे वाटते. थोडक्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात असाच थंडीचा चढ-उतार जाणवेल, असे वाटते. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune

टॅग्स :हवामानशेती क्षेत्रशेतीतापमान