Join us

Katepurna Dam Update : काटेपूर्णा धरणातून विसर्ग सुरू; पावसामुळे जलसाठ्यात वाढ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:27 IST

Katepurna Dam Update : काटेपुर्णा धरणातून सध्या चार गेटमधून १९७.९२ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. मुसळधार पावसामुळे जलसाठा वाढल्याने प्रशासनाने पाणलोट क्षेत्रातील संभाव्य पूर टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात सतर्क राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. (Katepurna Dam Update)

Katepurna Dam Update : गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काटेपुर्णा धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. (Katepurna Dam Update)

हवामान खात्याचा अंदाज व वाढती पाणीपातळी लक्षात घेता संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.(Katepurna Dam Update)

नागरिकांनी नदीकाठच्या भागात सतर्क राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.(Katepurna Dam Update)

१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता धरणाचे दोन गेट प्रत्येकी दोन फुटाने उघडण्यात आले. त्यातून ९८.९६ घनमीटर प्रति सेकंद पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

मात्र, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एक तासानंतर रात्री ८:३० वाजता आणखी दोन गेट दोन फुटाने उघडण्यात आले. त्यामळे सध्या एकुण चार गेटमधून १९७.९२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

धरणाच्या जलाशय परिचालन आराखडा नुसार १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत धरणात ९८.७८ टक्के जलसाठा आरक्षित ठेवावा लागतो. या पंधरवड्याच्या नियमानुसार धरणाची पाणी पातळी स्थिर आहे.

हे ही वाचा सविस्तर :Marathwada Crop Damage : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतं जलमय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकाटेपूर्णा धरणशेतकरीशेती