Agriculture News : सद्यस्थितीत रब्बी हंगामातील (Rabbi Season) गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकाची लागवड सुरु आहे. अनेक ठिकाणी लागवडीची लगबग सुरु आहे. अशा स्थितीत या पिकासाठी विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडून सामान्य कृषी सल्ला (Agriculture Advice) देण्यात आला आहे.
गहू पिकासाठी बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी गहू पिकास शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसानंतर पिकावर २०० ग्रॅम १९:१९: १९ या विद्राव्य खताची किंवा डीएपी या खताची १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर २१ दिवसांनी हेक्टरी ६० किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा.
हरभरा पिकासाठी हरभरा सारख्या संवेदनशील पिकांचे दंव प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी, सल्फ्यूरिक ऍसिड @ 0.1% (1 लिटर H2SO4 1000 लिटर पाण्यात) किंवा थायोरिया 500 पीपीएम (500 ग्रॅम थायोरिया 1000 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करा. थंडीपासून हरभरा पिकाचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार पाणी / तुषार सिंचन च्या सहाय्याने द्यावे
ज्वारी पिकासाठी बागायती खालील रब्बी ज्वारी पिकास नत्र खताचा उर्वरित दुसरा हप्ता (युरिया २५ किलो) पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.
रब्बी पिकासाठी रब्बी मका पिकास नत्र खताचा उर्वरित दुसरा हप्ता (युरिया १६ किलो) पेरणीनंतर ३० दिवसांनी व तिसरा हप्ता (युरिया १६ किलो) पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी द्यावा.
- ग्रामीण कृषि मौसम सेवा, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.