Join us

Jayakwadi Water Release : जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडले; ३१४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:42 IST

पैठण येथील जायकवाडी धरणओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग सुरू करून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली होती. त्यानुसार आज दुपारी धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.

दादासाहेब गलांडे

दरम्यान, आज सकाळी ६ वाजता जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर पाणीसाठा ९८ टक्के झाल्यानंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान नाथसागर धरणाचे गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ आणि २१ असे एकूण सहा दरवाजे ०. ५ फुट उंचीने उघडून ३ हजार १४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला.

त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील गोदावरी नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.

टॅग्स :जायकवाडी धरणपैठणगोदावरीमराठवाडानांदेडजालनाजालना