Join us

Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली

By मुक्ता सरदेशमुख | Updated: June 3, 2024 11:47 IST

आज दि ३ जून रोजी जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ०.१८ टीएमसीवर!

राज्यभरातील धरणसाठा तळाला जात असताना मराठवाड्यातील धरणांमधीलपाणीसाठा वेगाने घटत आहे. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसत असल्याचे चित्र आहे. जायकवाडी धरण आता अवघ्या ४.३८ टक्क्यांवर आले असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

पावसाळा आता अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. मंगळवार दि ४ तारखेपासून राज्यात मान्सून दाखल होणार असला तरी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आज ९५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ०.१८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला असून शेतीसह जनावरांना पिण्यास पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.

मराठवाड्यातील वाड्या वस्त्यांमध्ये आता पाण्याचे स्त्रोत आता आटले आहेत. विहिरी कोरड्या पडत असून टँकरच्या पाण्यावर विसंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तापमानही अधिक असल्याने धरणसाठ्याचे बाष्पीभवन वाढले आहे.  जायकवाडी धरणावर पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक, औष्णीक वीज केंद्र, तसेच शेतीही अवलंबून आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीमराठवाडा वॉटर ग्रीडधरण