Join us

cyclone Update: बंगालच्या उपसागरावर धडकणार चक्रीवादळ, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 23, 2024 5:17 PM

हवामान विभागाकडून महत्वाची माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून मोठे चक्रीवादळ तयार होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रात अवकाळी पावसाला पोषक वातावरण असून पुढील काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील या हंगामातील हे पहिले चक्रीवादळ असून रविवारी संध्याकाळपर्यंत बांग्लादेश आणि लगतच्या बंगालच्या किनारपट्टीपर पाेहचेल.

कधी व कोणत्या किनारपट्टीवर धडकणार वादळ?

पश्चम बंगाल व उत्तर ओडीशा या राज्यांच्या किनारपट्टीवर २६ आणि २७ मेदरम्यान हे चक्रीवादळ दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा वेग ७० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

चक्रीवाळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात मोठा हवमान बदल जाणवेल. महाराष्ट्रात याचा फारसा प्रभाव दिसणार नसून महाराष्ट्राला कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. येत्या दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात देण्यात आला असून काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :चक्रीवादळहवामानपाऊसमहाराष्ट्र