Join us

मराठवाड्यात ६ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 19, 2024 3:56 PM

Today's Rain Alert: मराठवाड्यात या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

राज्यात काही भागात पावसाची तर काही भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर पुढील ३ दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. आज दिनांक १९ मे राेजी पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील.

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज दि १६ मे रोजी धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार असून दि १९ मे ते २२ मे पर्यंत पावसाला पोषक वातावरण राहणार आहे. दि २१ मे रोजी धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर दि २१ व २२ मे रोजी मे रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :पाऊसमराठवाडाहवामान