Join us

मराठवाड्यात धाराशिव लातूरसह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता, पुढील तीन तासांत...

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 09, 2024 4:48 PM

राज्यात आज या ठिकाणी यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज नेमका काय? जाणून घ्या..

हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून दुपारी तीन मिळालेल्या माहितीनुसार आज (मंगळवारी)  पुढील तीन ते चार तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड , हिंगोली जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

विदर्भात कुठे आहे अलर्ट?

बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा

टॅग्स :पाऊसहवामानगारपीटतापमानमराठवाडा