Join us

शेतमजूर ते यशस्वी उद्योजक रंजनाताईंची यशस्वी वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:16 AM

बचत गटाच्या माध्यमातून मजुरी करणारी महिला झाली व्यावसायिक.

गोविंद शिंदे

कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी बचत गटाचा आधार घेतल्यानंतर याच माध्यमातून स्वतःची व्यापारी अशी ओळख निर्माण करणाऱ्या रंजना गायकवाड यांचे कार्य इतर महिलांसाठी प्रेरणा देणारे आहे. जिद्द, चिकाटी या गुणांबरोबरच व्यावसायिक कौशल्य दाखवून रंजना यांनी उत्कर्षाची नवी वाट तयार केली आहे.

शासनाच्या विविध संकल्पनेतून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी शेतमजुरी करणाऱ्या महिलेला व्यापारी बनवल्याची यशोगाथा चिखली येथील आहे. या महिलेने शेतमजुरी करून बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. स्वतःचे पैसे व काही बचत गटाचे पैसे टाकून त्यांनी आता आपली व्यापारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.

चिखली येथील रंजना शिवाजी गायकवाड या आठवी पास असून, दररोज गावातील इतरांच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या भागवितात. उरलेल्या पैश्यातील १०० रुपयांपासून त्यांनी आपल्या कच्चा मालांपासून पत्रावळी या व्यवसायाला प्रारंभ केला होता. तसेच शासनाच्या उमेद महिला स्वयंसहायता समूह गटातून मार्गदर्शन घेतलेले आहे.

नोकरीचा मार्ग सोडत दुष्काळग्रस्त भागात तरुणाने उभरली संत्र्याची बाग

मशिनरीज व इतर कच्चा माल केला उपलब्ध

व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यासाठी मशिनरीज व इतर कच्चा माल उपलब्ध केला. यासाठी मला १ लाख रुपयांची आवश्यकता होती, ते जमा केले. त्यामुळे आज मी माझ्यासह इतर दोघांना रोजगार देऊन माझा व्यवसाय जिल्हाभरात वाढविला आहे. या व्यवसायात माझी मुलगी व पती यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. - रंजना गायकवाड, चिखली

रंजना गायकवाड बनल्या लखपती

  • व्यवसायात कष्ट घेतले, चिकाटी दाखवून दिली तर नक्कीच फायदा होतो. सुरुवातीला आर्थिक उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय सुरु केला. आज त्या लखपती बनल्या.
  • ज्या महिलेला दहा हजार रुपये व्यवसाय तयार करण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ आली होती, त्या महिलेने आज आपल्या व्यवसायात तीन लाखांचे भांडवल तयार केले.
टॅग्स :महिलाशेतकरीनांदेडग्रामीण विकासशेती