- अमरचंद ठवरेगोंदिया : ग्रामीण क्षेत्रातील महिला आता उद्योगासह क्षेत्रासह इतरही क्षेत्रांत प्रगती साधत आहे. गावकऱ्यांच्या रोजच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना गावातच रास्त दरात उपलब्ध करून देत रोजगार निर्मिती केली. असाच बचत गट ते मिनी बँकपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मनीषा मुनेश्वर शहारे या महिलेचा आहे.
तालुक्यातील मोरगाव गावातील मनीषा मुनेश्वर शहारे यांचा ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणापासून बँकिंग सेवा, नवीन व्यवसायापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. २०१५ मध्ये उमेद अभियानांतर्गत आयसीआरपी म्हणून नियुक्त झालेल्या मनीषा यांनी गावात बचत गटांची कमानीसारखी पायाभरणी केली.
तेव्हा गावात एकही बचत गट नव्हता. त्यांनी गावभर फिरून महिलांना बचत गटाचे फायदे समजावून सांगितले. १२ नवीन बचत गट स्थापन केले. या गटांमधील महिलांना गटाचा हिशेब कसा ठेवायचा, मासिक बचत, शासकीय योजना आणि कर्ज घेऊन व्यवसाय कसा सुरू करायचा याचे मार्गदर्शन केले.
कर्ज घेऊन मिनी बँक सुरु केली २०२० च्या कोरोना संकटकाळात गावातील वृद्धांना बँकेत जाण्यासाठी खूप अडचणी येऊ लागल्या. पैशाची तंगी सहन करावी लागत होती. या समस्येवर उपाय शोधत मनीषा यांनी बैंक ऑफ बडोदाकडून बचत गटामार्फत एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. 'बीसी सखी' म्हणून गावातच मिनी बँक सुरू केली. आता गावकऱ्यांना घरबसल्या बँकिंग सुविधा मिळतात. रोख रक्कम जमा, पैसे काढणे, विविध व्यवहार, या कामांतून मिळणाऱ्या कमिशनमधून त्यांची आर्थिक स्थिती बरीच सुधारली.
सामाजिक कार्याला मिळाले नवे रूपव्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी विसरलेल्या नाहीत. मनीषा यांनी ""मनीषा सामाजिक संस्था"" स्थापन केली आहे. संस्थेमार्फत त्या वैद्यकीय शिबिरे आयोजित करतात, नवीन शासकीय योजनांची माहिती देतात आणि कायद्यांविषयी जागृती करतात. ग्रामीण महिलांना सक्षम करणे हेच माझे ध्येय आहे, असे त्या सांगतात. मनीषा यांच्या या कार्याने गावाला नवी दिशा मिळण्यास मदत झाली.
Web Summary : Manisha Shahare, with a bank loan, started a mini-bank in her village, solving locals' money problems. Her initiative provides banking services, boosting the village economy. She also runs a social organization for health and legal awareness, empowering rural women.
Web Summary : मनीषा शहारे ने बैंक ऋण से अपने गाँव में एक मिनी-बैंक शुरू किया, जिससे स्थानीय लोगों की धन संबंधी समस्याओं का समाधान हुआ। उनकी पहल बैंकिंग सेवाएं प्रदान करती है, जिससे गाँव की अर्थव्यवस्था को बढ़ावा मिलता है। वह स्वास्थ्य और कानूनी जागरूकता के लिए एक सामाजिक संगठन भी चलाती हैं, जो ग्रामीण महिलाओं को सशक्त बनाती है।