Join us

Farmer Success Story : टोमॅटोचं लाल सोनं; ३० गुंठ्यातून वाबळे बंधूंनी कमावले लाखो! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:31 IST

Farmer Success Story : यशस्वी शेती म्हणजे केवळ मेहनत नाही, तर अचूक नियोजन आणि नविन प्रयोगांची जोडदेखील असते, हे गोरेगावच्या वाबळे बंधूंनी सिद्ध केले आहे. फक्त ३० गुंठे टोमॅटो शेतीतून त्यांनी मिळवलेले उत्पन्न हे लाखोंमध्ये पोहोचले आहे. कृषी प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन, मल्चिंग, ड्रिप सिंचन आणि आधुनिक व्यवस्थापनाचा अवलंब करून त्यांनी शेतीला एक वेगळं रूप दिलं आहे.(Farmer Success Story)

दिलीप कावरखे

यशस्वी शेती म्हणजे केवळ मेहनत नाही, तर अचूक नियोजन आणि नविन प्रयोगांची जोडदेखील असते, हे गोरेगावच्या वाबळे बंधूंनी सिद्ध केले आहे. (Farmer Success Story)

फक्त ३० गुंठे टोमॅटोशेतीतून त्यांनी मिळवलेले उत्पन्न हे लाखोंमध्ये पोहोचले आहे. कृषी प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन, मल्चिंग, ड्रिप सिंचन आणि आधुनिक व्यवस्थापनाचा अवलंब करून त्यांनी शेतीला एक वेगळं रूप दिलं आहे.(Farmer Success Story)

हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील शेतकरी गणेश आणि रमेश वाबळे या बंधूंनी फक्त ३० गुंठ्यांत टोमॅटोची यशस्वी लागवड करून सुमारे ४ लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवून यश मिळवले आहे. (Farmer Success Story)

पारंपरिक शेतीला आधुनिक नियोजनाची जोड दिल्यास यश काही अशक्य नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. (Farmer Success Story)

टोमॅटो शेतीचा प्रयोग

वाबळे बंधूंच्या मालकीची एकूण २० एकर शेती आहे. पारंपरिकपणे ते कांदा शेतीत बियाण्याच्या उत्पादनासाठी कार्यरत होते. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये बारामती कृषी प्रदर्शनाला दिलेल्या भेटीत त्यांना भाजीपाला उत्पादनाचे महत्त्व आणि नफ्याची संधी लक्षात आली. विशेषतः टोमॅटो लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पाहून प्रेरणा घेत त्यांनी प्रयोग करण्याचे ठरवले.

टोमॅटो लागवड

५ मे रोजी सुरू झालेली टोमॅटो लागवड

क्षेत्र: ३० गुंठे

वाण: सिजेंटा २०४८

रोपे: ५,०००

तंत्रज्ञान: मल्चिंग पेपर, ड्रिप सिंचन

खते/औषधे: जैविक + सकारात्मक रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशके

झाडांची बांधणी: तार व काठीचा वापर

एकूण खर्च: ४० हजार रुपये

मल्चिंगमुळे पाण्याची बचत झाली, तणनियंत्रण सोपे झाले, तर ड्रिपमुळे पोषण आणि सिंचन योग्य वेळी देता आले.

कष्टाची गोड फळे!

पहिला तोडा: २० जुलै रोजी

एकूण ४ तोडे पूर्ण: २२५ कॅरेट उत्पादन

प्रतिकॅरेट दर: ८५० ते १ हजार १०० रुपये

आतापर्यंतचे उत्पन्न: २ लाख १० हजार रुपये

अंदाजित एकूण उत्पन्न (सप्टेंबरपर्यंत): ३.५ ते ४ लाख रुपये

हिंगोली व वाशिमच्या भाजीपाला बाजारात त्यांना चांगला दर मिळाला. अजून ३-४ तोडे अपेक्षित असल्यामुळे त्यांचा एकंदरीत नफा सुमारे ३ लाखांपर्यंत जाऊ शकतो.

यशाचे सूत्र: प्रेरणा + नियोजन + तंत्रज्ञान

गणेश व रमेश वाबळे बंधू शेतीतील नवकल्पनांसाठी नेहमी सजग असतात. त्यांनी प्रदर्शनातून प्रेरणा, योग्य वाणाची निवड, तणनियंत्रणासाठी मल्चिंग, पाणीबचतीसाठी ड्रिप, योग्य बाजारपेठेची निवड यामुळे नफा कमावला.

फक्त मेहनत नाही, तर योग्य दिशा आणि नियोजन आवश्यक आहे. छोट्या प्लॉटमध्येही चांगले उत्पन्न शक्य आहे, जर तांत्रिक व्यवस्थापन केले गेले तर. - वाबळे बंधू, गोरेगाव

वाबळे बंधूंची ही टोमॅटो शेती यशोगाथा तरुण व नवशिक्या शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरावी. शेतीमध्ये बदल स्वीकारून नवे प्रयोग केल्यास उत्पन्नात वाढ आणि आर्थिक स्थैर्य नक्कीच साधता येते, हे त्यांनी सिध्द केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : परंपरा मोडून आधुनिकतेकडे: इटकापल्ले बंधूंचा यशस्वी केळीचा प्रयोग

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीटोमॅटोशेतकरी यशोगाथा