Join us

हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 12:52 PM

सेलम हळदची बात न्यारी

गोविंद शिंदे 

यंदा हळद पिकावर विविध प्रकारची रोगराई आली होती. परंतु चिंचोली येथील सुभाष आत्माराम कौसल्ये या शेतकऱ्याने सव्वा एकर शेतीमध्ये ५० क्विंटल हळद पिकविली. शेणखत व लिंबोळी अर्कचा वापर करून त्यांनी विक्रमी उत्पादन काढले. शेतकऱ्याच्या मेहनतीचे सोने झाले, अशा भावना व्यक्त होत आहेत.

या शेतकऱ्याने आपल्या सव्वा एकर शेतामध्ये मे महिन्यात शेणखत टाकून प्रथम रूटर केले. त्यानंतर त्यांनी बैलजोडीच्या साह्याने चार फुटांचे बेड तयार केले. या बेडवर भेसळ खते म्हणून त्यांनी लिंबोळी पेंड, डीएपी, पोट्याश, सुपर दामोदर या सर्व मिश्र खतांचा वापर करून एक जून रोजी चार बोटांच्या अंतरावर बेणे टाकले. या पिकामध्ये तण निघू नये म्हणून त्यांनी रासायनिक तणनाशकाचा डोस व इतर डोस ठिबकद्वारे सोडले.

तसेच दोन वेळेस माती लावणे, तीन वेळेस वखरणी केली सुभाष कौसल्ये यांनी केली. सेलम जातीच्या या हळदीच्या पिकाची लागवड कशी फायदेशीर ठरली हे सांगतांना, पारंपारिक ऐवजी मसाले पिकांची लागवड फायदेशीर असल्याचे कौसल्ये सांगतात.

हळद पिकातून नांदेड जिल्ह्यातील चिंचोली येथील या तरुण शेतकऱ्यांच्या मेहनतीचे सोने झाले आहे. उत्पादन घेण्यासाठी ८० हजार रुपये खर्च झाला असून, यातून त्यांना उत्पन्न चांगले मिळाले आहे. तसेच हळदीला भावही योग्य मिळाल्याने विक्रीतून आठ लाख रुपये हाती आले आहे.

मिरची आंतरपीकातून ३० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न

सुरुवातीला सव्वा एकर शेतीसाठी अडीच हजार रुपये क्चिटलप्रमाणे आठ क्विंटल बेणे विकत घेतले. सव्वा एकर शेतात त्यांनी शेणखत टाकले. त्यासोबतच लिंबोळी पेंडेचा वापरही केला. हळद काढणीच्या वेळेस मजुराचा वापर केला. तसेच हळदीमध्ये मिरचीचे आंतरपीक घेतले. त्यातून ३० हजार रुपये उत्पन्न मिळाले.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :पीकशेतकरीशेतीनांदेडनांदेडमिरचीपीक व्यवस्थापन