Join us

पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:09 PM

पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला. १४ एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली. यावर्षी द्राक्ष शेतीतून करोडपती होण्याचे स्वप्न साकार झाले.

शिवाजीराव जगताप यांना वडिलोपार्जित १८ एकर शेती होती. यामध्ये ऊस, लिंबू, द्राक्ष अशी पिके घेत होते. त्यांच्याकडे दोन पोकलेन होते. दोनही पोकलेन विकून टाकले आणि पाच एकर शेती घेतली. त्यांचे २२ एकर क्षेत्र झाले.

जयदीपने पदवीचे शिक्षण घेत असताना पिकाचा पॅटर्न चेंज करण्यासाठी बापूराव लडकत यांच्याशी मैत्री केली. त्यातूनच द्राक्ष शेती १४ एकरापर्यंत वाढविली. मागील तीन वर्षे अपेक्षित उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शेती अडचणीच्या उंबरठ्यावर होती. अशा परिस्थितीत जयदीपने हिंमत सोडली नाही.

यावर्षी द्राक्षांना ४० ते ५५ रुपये किलो भाव मिळाला. जयदीपच्या कष्टाचे चीज झाले. यावर्षी पाऊस कमी असतानाही द्राक्षाचे एकरी अपेक्षित उत्पादन मिळविले. त्यातून १ कोटी २५ लाखाचा नफा मिळविला. पारगाव सुद्रिकचा जयदीप जगताप हा युवक शेतीतून करोडपती झाला.

शेती करावी की नाही, असा प्रश्न मनात होता. पण, आपण पदवीधर झालो आहेत. शेतीत करिअर करायचे ठरविले आणि बापूराव लडकत यांचा सल्ला घेतला. त्यातून यश मिळत गेले. शेतीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. सहाव्या वर्षी शेतीतून यश मिळाले. तरुणांनी धाडस करीत भांडवली शेतीकडे वळावे. - जयदीप जगताप, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पारगाव सुद्रिक

अधिक वाचा: सचिनच्या जिद्दीला नाही तोड; अपार कष्टाने पिकविलेला पेरू दुबईत झाला गोड

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेतीश्रीगोंदापाऊसपीकफलोत्पादन