सहदेव खोतपुनवत गुळदरात होत असलेली परवड, कामगारांचा तुटवडा आणि वाढता उत्पादन खर्च, अशा अनेक संकटांवर मात करीत आणि शिराळा तालुक्यातील इतर गावांतील Gurhal Ghar गुऱ्हाळ उद्योग संपुष्टात आला आहे.
गुऱ्हाळ उद्योगला घरघर लागली असतानाही कणदूर (ता. शिराळा) येथील गुऱ्हाळ मालक सुभाष पाटील यांनी घरच्या लोकांच्या मदतीने तालुक्यातील एकमेव गुऱ्हाळघर टिकवून ठेवले आहे. त्यामुळे चालू हंगामात तालुक्यात फक्त कणदूर येथेच नव्या गुळाची निर्मिती होताना दिसत आहे.
शिराळा तालुका हा पूर्वीपासून गुऱ्हाळ उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात आरळ्यापासून ते देववाडीपर्यंतच्या असंख्य गावांत शेकडो गुऱ्हाळघरे होती. दिवाळी ते गुढीपाडवा यादरम्यान ही गुऱ्हाळघरे सुरू असायची.
प्रत्येक गावागावांत शेकडो लोकांना या गुऱ्हाळघरात रोजगार मिळायचा. असंख्य शेतकरी गुऱ्हाळघरात नेऊन ऊस गाळून गूळ बनवायचे व कऱ्हाड, कोल्हापूरच्या बाजारपेठेत हा गूळ पाठवायचे.
परंतु काळाच्या ओघात या गुऱ्हाळघरांना घरघर लागून अनेक गावांतील गुऱ्हाळघरे कायमस्वरूपी बंद झाली. कणदूर गावात या अगोदर ११ गुऱ्हाळघरे होती; परंतु विविध समस्यांमुळे ती बंद झाली.
सध्या सुभाष पाटील या शेतकऱ्याने मात्र आपले गुऱ्हाळघर विविध अडचणी असतानाही सुरू ठेवले आहे. या गुऱ्हाळघरासाठी त्यांच्या घरातील सर्व लोक राबत आहेत. अपुरे कामगार असतानाही त्यांनी हा व्यवसाय बंद न करता पुढे चालू ठेवला आहे.
सुभाष पाटील यांच्यासह त्यांचे दोन भाऊ व घरातील इतर व्यक्तीही दररोज या कामांमध्ये व्यस्त असतात. बाहेरील काही मोजकेच लोक या गुऱ्हाळघरात काम करतात. सध्या सुभाष पाटील यांनी स्वतःच्या शेतातील सर्व ऊस गुऱ्हाळघरात गळीत करण्याचे काम सुरू ठेवले आहे.
गुऱ्हाळघरांसमोरील समस्या१) बाजारपेठेत अपेक्षित दराचा अभाव.२) कामगारांचा तुटवडा.३) गुऱ्हाळ घराकडे शेतकऱ्याऱ्यांनी फिरवलेली पाठ.४) उत्पादन खर्चात झालेली वाढ.५) गळितासाठी लागणारे प्रचंड व्याप.
या उद्योगात मोठी गुंतवणूक केल्याने ती वाया जाऊ म्हणून हा उद्योग टिकवला आहे. गुहाळ उद्योग अडचणीतून वाटचाल करत आहे. चांगला दर व शासनाकडून प्रोत्साहन मिळाले तरच भविष्यात हा उद्योग टिकेल. - सुभाष पाटील, गुऱ्हाळमालक, कणदूर
अधिक वाचा: क्षारपड जमिनीत या प्रणालीचा वापर करून एकरी ८२ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या सलगर बंधूंची यशकथा