Join us

एका एकरात घेतले २५० क्विंटल उत्पादन, टरबूजाने ६५ दिवसांत दिले अडीच लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 12:44 PM

कमी पाण्यावर टरबुजाचे पीक घेता येते. छोटीवाडी येथील शेतकऱ्याने योग्य पाण्याचे नियोजन करत अवघ्या ६५ दिवसांत अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

शेतीत उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर नेहमीच कर्जाचा डोंगर असतो. अशातच नापिकी, पीककर्ज यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पाण्याचे योग्य नियोजन करत माजलगाव तालुक्यातील छोटीवाडी येथील शेतकरी अशोक भांगे यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

एक एकर शेतात टरबूज फळपिकाची लागवड करून ६५ दिवसात अडीच लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या शेतीचा पोत दर्जेदार तर आहेच, शिवाय शेतात कूपनलिका असल्याने त्याला चांगले पाणी आहे. भांगे यांनी शेतात उसाचे पीक काढल्यानंतर शेतीची मशागत केली. संकरित बियाणाचा वापर करून टरबूज लागवड केली. पिकाला आवश्यक प्रमाणात पाणी देण्याकरिता ठिंबक सिंचनाचा उपयोग केला. जमिनीतील ओलावा कायम राहावा याकरिता मल्चिंग आथरले व एक एकर क्षेत्रात २५० क्विंटल टरबुजाचे भरघोस उत्पादन घेतले. टरबुजाला एक हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दराने विकून अडीच लाख रुपयाचे विक्रमी उत्पादन घेतले. अशोक भांगे यांनी घेतलेले पीक इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरत आहे.

हेही वाचा- सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकऱ्याने एक एकरात लागवड केलेल्या टरबूज विक्रीतून ७० दिवसांमध्ये १ लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. यातून ३५ हजार रुपये खर्च वजा जाता शेतकऱ्याला १ लाख ३५ हजार रुपये निव्वळ नफा झाला. पहिल्यांदाच टरबुजाची लागवड केली असून पुढेही लागवड करणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

२. भातशेतीला फाटा देत सौरभने घेतले कलिंगडाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन

भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण घेत असताना यशस्वी करून दाखविला. कसे केले पीक व्यवस्थापन? जाणून घ्या..

टॅग्स :लागवड, मशागतशेतीपाणीकपात