Join us

तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य चांगले आहे हे कधी व कसे समजावे? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:44 IST

माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.

माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.

पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने मातीमध्ये असणारे घटक व त्यांचे योग्य प्रमाण असावे, असे काही संकेत आहेत. जर मातीतील घटकांचे प्रमाण योग्य असेल तर मातीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.

यापेक्षा प्रमाण कमी किंवा जास्त आढळले तर मातीच्या आरोग्यावर उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी माती परीक्षण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

मातीमध्ये असणारे घटक व त्यांचे योग्य प्रमाण१) सामू (पीएच) ५.५ ते ७.५२) क्षारता (ईसी) ० ते १.००३) सेंद्रिय कार्बन (ओसी) ०.४०-६०%४) नत्र २८० ते ४२० किलो प्रतिहेक्टर५) स्फुरद १४ ते २१ किलो प्रतिहेक्टर६) पालाश १५० ते २०० किलो प्रतिहेक्टर७) कॉपर (तांबे) ०.२०-२९.९९ पीपीएम८) लोह (फेरस) ४.५-९९.९९ पीपीएम९) जस्त (झिंक) ०.६१-९९.९९१०) मंगल २.०० ते ९९.९९११) बोरॉन ०.१ ते ०.५ पीपीएम१२) मॅग्नेशियम ०.०३ ते ०.८४ पीपीएम१३) मॉलिब्लेडम ०.०३ ते ०.०६ पीपीएम१४) गंधक १० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम१५) युक्त सोडियम ० ते ५.०० याप्रमाणे असावे.

- सुनील यादवउपविभागीय कृषी अधिकारीजिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी कार्यालय, सातारा

अधिक वाचा: सुधारित पंचनामे पूर्ण, आकडा वाढला; 'या' सहा जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy Soil: Test, Components, and Ideal Levels for Your Farm

Web Summary : Soil testing is crucial to ensure optimal crop yield. Ideal soil pH, salinity, organic carbon, nitrogen, phosphorus, potash, copper, iron, zinc, manganese, boron, magnesium, molybdenum, sulfur, and sodium levels are key indicators of healthy soil. Maintaining these levels is essential for productive agriculture.
टॅग्स :शेतीशेतकरीपीकपेरणीखते