एखाद्या अज्ञान (१८ वर्षांपेक्षा कमी) व्याक्तीच्या नावे एखादी मालमत्ता खरेदी केली जाते तेव्हा त्या अज्ञान व्यक्तींच्या सोबत 'अ.पा.क.' (अज्ञान पालक कर्ता) असा शेरा लावला जातो.
म्हणून त्याच्या सज्ञान नातेवाईकाचे नाव गाव नमुना सात-बारावर दाखल करण्यात येते कारण अज्ञान व्यक्तीला कोणताही व्यवहार करण्याची परवानगी कायदा देत नाही.
अशा अज्ञान व्यक्तीचे वय जेव्हा १८ वर्षे पेक्षा जास्त होते तेव्हा त्याचे नाव खातेदार म्हणून गाव नमुना सात-बारा सदरी दाखल करता येते. परंतु यासाठी अगोदर सातबाऱ्यावरील त्याच्या नावापुढील अपाक शेरा काढावा लागतो.
अज्ञान पालक कर्ता (अपाक) म्हणून नाव दाखल असलेल्या व्यक्तीचे गाव नमुना सात-बारा वरुन कमी करण्यात येते. याला अ.पा.क. ची नोंद कमी करणे असे म्हणतात.
अ.पा.क. ची नोंद कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे१) मूळ खरेदी दस्ताची (अज्ञानाच्या नावे खरेदी केल्याची) साक्षांकीत प्रत.२) अ.पा.क. दाखल असलेल्या फेरफारची नक्कल.३) अ.पा.क. दाखल असलेल्या गा.न. ७-१२ ची नक्कल.४) अर्जदाराच्या आधार कार्डची स्वसाक्षांकीत प्रत.५) अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यालचा पुरावा साक्षांकीत प्रत.६) सर्व हितसंबंधितांचे रहिवास पत्ते.
याकरिता अर्ज करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी/तलाठी यांचेशी संपर्क साधून अर्ज करू शकता अथवा ई-हक्क प्रणालीवरून ऑनलाईनही अर्ज करता येतो.
अधिक वाचा: सातबारावरून मयत खातेदाराचे नाव कमी करण्यासाठी कसा कराल अर्ज? वाचा सविस्तर
Web Summary : When a minor owns property, 'A.Pa.Ka' is added to Satbara. After attaining adulthood, remove it by submitting purchase documents, identity proof, and an application via the Talathi office or online.
Web Summary : जब कोई नाबालिग संपत्ति का मालिक होता है, तो सातबारा में 'अ.पा.क' जोड़ा जाता है। वयस्क होने पर, खरीद दस्तावेज, पहचान प्रमाण और तलाठी कार्यालय या ऑनलाइन के माध्यम से एक आवेदन जमा करके इसे हटाएं।