Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेलवर्गीय पिकांत तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी करा 'ह्या' अन्नद्रव्याचा वापर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:31 IST

तेलवर्गीय पिके यामध्ये सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल आदी पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यामध्ये 'हे' अन्नद्रव्य खूप मोठी भूमिका बजावली जाते.

पिकांसाठी गंधक महत्त्वाचे ठरते. गंधक अन्नद्रव्यामुळे खास करून तेलवर्गीय पिके यामध्ये सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल आदी पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यामध्ये (२ ते ११ टक्के) खूप मोठी भूमिका बजावली जाते.

त्यादृष्टीने शेतकऱ्यांना तेलवर्गीय पिके व कडधान्य वर्गीय पिके घेताना खतांच्या वापरासोबत प्राधान्याने गंधक अन्नद्रव्य उपलब्ध असलेली खते वापरणे खूपच गरजेचे आहे. याशिवाय गंधकाची पिकांच्या वाढीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे.

अमोनियम सल्फेट गरजेचे◼️ भुईमूग पिकामध्ये खतांचा वापर करताना यासोबत गंधक युक्त खतांची मात्रा साधारणपणे २० ते ३० किलो प्रतिहेक्टरी याप्रमाणे दिली तर ते खूप फायदेशीर ठरते.◼️ याशिवाय सुपर फॉस्फेट आणि जिप्सम हे भुईमुगासाठी अतिशय चांगल्या प्रकारची खते आहेत.◼️ कारण, भुईमूग या पिकांमध्ये शेंग तयार होण्यासाठी कॅल्शियमची खूपच आवश्यकता असते.◼️ गंधकाची कमतरता दूर करण्यासाठी अमोनियम सल्फेट हेदेखील अतिशय चांगल्या प्रकारचे खत आहे.

अधिक वाचा: मशीनने उसतोड केल्यावर एकरी ऊस उत्पादनात घट होते का? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Use This Nutrient to Increase Oil Content in Oilseed Crops

Web Summary : Sulfur is crucial for oilseed crops like soybean, groundnut, and sunflower, boosting oil content by 2-11%. Farmers should prioritize sulfur-rich fertilizers. Ammonium sulfate is beneficial, especially for groundnut, alongside super phosphate and gypsum. Apply 20-30 kg/hectare of sulfur fertilizer for optimal results.
टॅग्स :शेतीशेतकरीपीकखतेकरडईसुर्यफुल