तूर पिकाच्या उत्पादनात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. सध्या तूरपीक फुलोऱ्यावर व शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
किडीची ओळख- या किडीचा पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो.- अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची व गोलाकार असतात.- या अंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटाकार असतो.- कोष गडद तपकिरी रंगाचा असतो.- मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागांवर केसांचा झुपका असतो.
नुकसानीचा प्रकार- अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठे कुरतुडून खातात.- अळी लहान असतांना कळी फुलोऱ्यावर तर मोठी अळी मुख्यत: शेंगावर आक्रमण करते.- ही अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाणे खाते.
कसे कराल व्यवस्थापन१) पिकात हेक्टरी १० कामगंध सापळे उभारावेत, यामुळे या अळीचे सर्वेक्षण व काही प्रमाणत नियंत्रण करण्यास मदत होईल.२) शेतात पक्षांना बसण्यासाठी मचाण म्हणजेच इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे ३० ते ४० प्रती हेक्टर उभारावेत.३) सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव कमी असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.४) तुरीमधील शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घाटे अळी/पिसारी पतंग व शेंग माशी यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीने नियंत्रण करावे यामध्ये तृणधान्याचे आंतरपिक असल्यास कीडीचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.५) एचएन.पी. व्ही (HNPV) या जैविक कीड नियंत्रकाचा वापर करावा६) फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क ५% दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १२ ते १५ दिवसांनी हेलीओकील (HNPV) ५०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारणी करावी.
अधिक वाचा: कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीवर मेटॅऱ्हाझीयम व ट्रायकोडर्मा बुरशी कशी वाढवावी