खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे.
मात्र, अजूनही अनेक शेतकरी बीजप्रक्रिया या टप्प्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे, ज्यामुळे त्यांना उत्पादनात फटका बसतो.
शेतीत यशस्वी आणि भरघोस उत्पादनासाठी बीजप्रक्रिया ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. योग्य बियाण्यांची निवड, योग्य प्रक्रिया आणि योग्य साठवणूक या गोष्टी शेतकऱ्याला मालामाल करू शकतात.
बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, तसेच बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा धोका कमी होतो. परिणामी, उगम चांगला होतो आणि पिकांची वाढ सशक्त होते.
थायरम, मॅन्कोझेब, अॅझोटोबॅक्टरची भूमिका महत्त्वाचीथायरम : बुरशीजन्य रोगांपासून बियाण्याचे संरक्षण.मॅन्कोझेब : विविध बुरशीजन्य रोगांविरुद्ध प्रभावी बुरशीनाशक.अॅझोटोबॅक्टर : नत्र स्थिरीकरणासाठी उपयुक्त जैविक खत, उगम व वाढ सुधारतो.
बियाण्यावर रोग प्रतिबंधात्मक उपाय काय कराल?प्रमाणित आणि रोगमुक्त बियाण्यांची निवड करा. तसेच बीजप्रक्रियेसाठी योग्य कीटकनाशक व बुरशीनाशक वापरा, उदा. थायरम, कॅप्टन, ट्रायकोडर्मा आदी बियाणे सावलीत वाऱ्यावर वाळवा थेट उन्हात नको. बियाणे साठवताना कोरड्या, स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. बीजप्रक्रिया केल्यानंतर लगेचच पेरणी करा. ही काळजी घेतल्यास बियाण्यांना सुरुवातीपासूनच रोगांपासून संरक्षण मिळते आणि उगम सुधारतो.
बीजप्रक्रियेनंतर बियाणे सावलीत वाळवणे आवश्यकबीजप्रक्रियेनंतर बियाणे सावलीत वाळवणे आवश्यक आहे. उन्हात वाळवल्यास बियाण्यांची गुणवत्ता आणि उगवण क्षमता घटू शकते. सावलीत वाळवल्यास, बियाणे योग्य आर्द्रतेवर वाळतात आणि त्यांची उगवणक्षमता टिकून राहते.
पिकाच्या उगवणक्षमता वाढीसाठी बीज प्रक्रिया आवश्यकबीज प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवणक्षमता वाढते. बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांपासून सुरुवातीपासूनच संरक्षण मिळते. उगम चांगला होतो व रोपे सशक्त वाढतात. उत्पादनात लक्षणीय वाढ होते. कमी खर्चात अधिक फायदा मिळतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया पहिला टप्पा आहे.
पाण्यावर तरंगणाऱ्या बिया काढून टाकाबियाणे निवडताना पाण्यात ते भिजवा आणि पाण्यावर तरंगणाऱ्या बिया खराब, कमकुवत किंवा उगवण क्षमतेस अयोग्य असतात, अशा बियांची पेरणी केल्यास उगवण कमजोर होण्याची शक्यता असते. अशा पाण्यावर तरंगणाऱ्या बिया काढून टाका. पाण्यात बुडणाऱ्या बियाण्यांचीच पेरणीसाठी निवड करा.
खते, बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवापावत्या म्हणजे खरेदीचा अधिकृत पुरावा या पावत्या बोगस बियाणे किंवा खते आढळल्यास तक्रार करताना उपयोगी येतात. शासनाच्या भरपाई योजनेत पावत्यांची आवश्यकता असते. वेष्टन, पिशवी, टॅग, थोडेसे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवा. पुरावा म्हणून कामात येतात.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक शेतकरी अद्याप या प्रक्रियेचे महत्त्व पूर्णतः लक्षात घेत नाहीत.
योग्य बीजप्रक्रिया केल्यास पिकांचा उगम सुधारतो, रोग व कीड नियंत्रणात येतात आणि उत्पादनात वाढ होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बियाण्यांची निवड, प्रक्रिया आणि साठवणूक याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
अधिक वाचा: दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर