Join us

ऊसाला पाणी कमी पडतंय.. हे करा आणि ऊसाची पाण्याची गरज भागवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 4:16 PM

जुलै, ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या ऊसाला सध्या पाण्याची गरज भासते. या ऊसाला शक्यतो पाणी देण्याचा प्रयत्न करावा. सध्या तीव्र ऊन जाणवत आहे परीणामी वाढत्या तापमानात पिकांना पाण्याची गरज भासते.

उष्ण तापमानामुळे पिकाच्या काही महत्त्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय आणि जीवरासायनिक क्रियांवर परिणाम होऊन बाष्पीभवनाचा वेग वाढतो. पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. त्यामुळे या काळात योग्य ते व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते.

जुलै, ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या ऊसाला सध्या पाण्याची गरज भासते. या ऊसाला शक्यतो पाणी देण्याचा प्रयत्न करावा. सध्या तीव्र ऊन जाणवत आहे परीणामी वाढत्या तापमानात पिकांना पाण्याची गरज भासते. त्याला ऊसपिक देखील अपताद नाही.

हल्ली बाजारात पाणी साठवून ठेवणाऱ्या पावडर उपलब्ध आहेत. या पाणी साठवुन ठेवणाऱ्या पावडर शेणखतात मिसळून शेतात टाका. या पावडर पाणी मिळाल्यावर ते शोषून ठेवतात. तसेच मोठ्या ऊसाची मोठी पाने काढून ती शेतात अंथरावी.

२ ते ३ टक्के पोटॅशचा वापर करून द्रावण तयार करावे, ते १५ दिवसांच्या अंतराने पिकांवर फवारणी करावे. यामध्ये ३ किलो पोटॅशसाठी १०० लीटर पाण्याचे प्रमाण ठेवावे. 

एक एकर ऊसाला चांगली वाढ असल्यास, ऊसाला ८ ते १० कांड्या असल्यास, तसेच पानांची संख्या चांगली असल्यास २ ते ३ हजार लीटर पाण्याचे प्रमाण प्रतिएकर फवारणीसाठी वापरावे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होण्यास मदत होते. पाण्याची गरज कमी होते.

तीव्र उन्हात हि फवारणी करु नये महिन्यातून दोन वेळा सकाळी ९ च्या आत या फवारण्या कराव्यात, उपलब्ध असल्यास गव्हाचे काड, पालापाचोळा जमीनीवर अंथरण्याचा पर्याय आहे, जमीन तापू नये यासाठी हा पर्याय आहे. जमीन तापलीच नाही, तर पाण्याची गरज आपोआप कमी होते.

बी. एस. घुले ऊस विशेषज्ञ

टॅग्स :ऊसपाणीशेतीशेतकरीपीक