Join us

Smart Farming : शेतकऱ्याचा जुगाड! ट्रॅक्टरच्या साहाय्याने ५ मिनिटांत होणार १ एकराची फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 14:53 IST

Smart Farming : हा व्हिडिओ परभणी जिल्ह्यातील असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. सेलू तालुक्यातील शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे.

परभणी : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान दिवसेंदिवस वाढत चालले असून वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे शेती सोपी होत चालली आहे. फवारणी, पेरणी, खुरपणी, काढणी, मळणी आणि काढणी नंतरच्या इतर सर्व कामामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे. तर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका शेतकऱ्याने फवारणीसाठी जुगाड बनवल्याचं दिसत आहे. 

(Tractor Spraying Video Viral)

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील असून येथील एका शेतकऱ्याने थेट ट्रॅक्टरलाच फवारणी मशून जोडले असून आडवा पाईप लावून त्याला फॉगर बसवले आहेत. यामुळे एकाच वेळी जवळपास १५ ते १८ फूट अंतरावरील क्षेत्रावर फवारणी केली जाऊ शकते. तर ट्रॅक्टरचे चाक काढून त्याला वेगळे चाकही बसवण्यात आले आहे. 

सोयाबीन पिकावर फवारणी केली जात असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असून या यंत्राद्वारे केवळ पाच मिनिटांच्या वेळात एका एकरावर पेरणी केली जाऊ शकते. शेतीकामासाठी मजुरांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकरी शेतीकामासाठी वापरात आणण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील ड्रायव्हरविना चालणाऱ्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये जीपीएस ऑटो पायलच या टूल्सचा वापर करून शेतकऱ्याने ड्रायव्हरविना ट्रॅक्टरविना पेरणी (Sowing) शक्य असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यानंतर आता पाच मिनिटांत एका एकरावर पेरणी करणाऱ्या ट्रॅक्टरचे जुगाड शेतकऱ्याने तयार केले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी