Join us
Daily Top 2Weekly Top 5

Aadhaar Mobile Number Update: आधार कार्डवरील मोबाईल नंबर आता घरबसल्या करता येणार अपडेट; कशी आहे प्रक्रिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:04 IST

Aadhaar Card Mobile No Update: तुम्ही आता घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकता. सरकारने नवीन आधार अ‍ॅपमध्ये ही सुविधा दिली आहे.

Aadhaar Mobile Number Update: तुम्ही आता घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकता. सरकारने नवीन आधार अ‍ॅपमध्ये ही सुविधा दिली आहे. त्याचवेळी तुमचा पत्ता, नाव आणि ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधाही लवकरच मिळणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने ही नवीन डिजिटल सेवा जाहीर केली आहे.

वापरकर्त्यांना हे बदल करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. अ‍ॅपवरील ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे सर्व काही बदलता येणार आहे. ही सेवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि स्थलांतरितांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. २००९ मध्ये आधार कार्ड प्रणाली सुरू झाली. १३० कोटींपेक्षा अधिक जणांकडे सध्या आधार कार्ड आहे.

एक महिन्यापूर्वी, यूआयडीएआयने आधारसाठी एक नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच केले. वापरकर्ते एकाच फोनवर पाच जणांच्या आधारची माहिती ठेवू शकतात.

अ‍ॅपमध्ये मोबाइल नंबर कसा अपडेट केला जाईल? 

◼️ प्ले स्टोर वरून Aadhaar हे अ‍ॅप डाउनलोड करा.◼️ सर्व परमिशन देऊन व  फेस ऑथेंटिकेशन करून अ‍ॅपमध्ये लॉगिन करा.◼️ स्क्रोल करून खाली जा, सर्व्हिसेस अंतर्गत माय आधार अपडेटवर क्लिक करा.◼️ नंबर अपडेट करण्याचा पहिला पर्याय दिसेल; त्यावर क्लिक करा.◼️ सध्याचा मोबाईल नंबर एंटर करा, ओटीपी व्हेरिफाय करा.◼️ नवीन मोबाईल नंबर एंटर करा, ओटीपी व्हेरिफाय करा.◼️ यानंतर फेस ऑथेंटिकेशन होईल; कॅमेऱ्यात पहा व एकदा डोळे बंद करा.◼️ यानंतर पेमेंट पर्याय दिसेल; ७५ रुपये जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

नवीन फिचर्स काय?◼️ ई-आधार नेहमी तुमच्यासोबत राहील, झेरॉक्सची गरज नाही.◼️ आयडी शेअर करण्यासाठी चेहरा स्कॅन करावा लागेल.◼️ अ‍ॅप बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह उघडते.◼️ इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध.◼️ इंटरनेट नसतानाही तुम्ही तुमचा आधार पाहू शकता.

नेमके काय होणार?◼️ अ‍ॅपद्वारे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी आहे.◼️ कोणतेही कागदपत्रे, प्रत्यक्ष भेटीची गरज नाही.◼️ संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत होईल.◼️ जर तुम्ही अ‍ॅप डाउनलोड केले नसेल, तर तुम्हाला ते डाउनलोड करावे लागेल.◼️ येथे, वापरकर्त्यांना त्यांचा आधार क्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल.◼️ यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, व्हेरिफिकेशन करावे लागेल.◼️ त्यानंतर ६ अंकी लॉगिन पिन सेट करावा लागेल

आधार मोबाईल अपडेट का आवश्यक आहे?◼️ आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे.◼️ मोबाईल नंबर हा यात सर्वांत महत्वाचा घटक आहे, कारण तो ओटीपीद्वारे बँक खाती, सरकारी अनुदाने, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या डिजिटल सेवांमध्ये प्रवेश प्रदान करतो.◼️ जर नंबर जुना झाला किंवा हरवला तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.◼️ पूर्वी तो अपडेट करण्यासाठी आधार केंद्रात जावे लागत असे, त्यात बायोमेट्रिक पडताळणीचा त्रास आणि लांब रांगा असायच्या.◼️ मात्र, यूआयडीएआयने आता ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सोपी केली आहे.

अधिक वाचा: डिजिटल सातबाऱ्याला अखेर कायदेशीर मान्यता; आता सर्व कामांसाठी वापरता येणार हा सातबारा

English
हिंदी सारांश
Web Title : Update Aadhaar mobile number at home via mobile: Process explained.

Web Summary : Aadhaar users can now update their registered mobile number from home using the new Aadhaar app. Address, name, and email updates are coming soon. This digital service simplifies the process, especially for those in remote areas, senior citizens, and migrants.
टॅग्स :आधार कार्डकेंद्र सरकारसरकारमोबाइलऑनलाइनबँक