Join us

Mati Parikshan : मातीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी किती वर्षांनी कराल माती परीक्षण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:20 IST

Soil Testing अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतजमिनीत विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्याचा विपरीत परिणाम होऊन जमिनीतील सुपीकता नष्ट होत चालली आहे.

अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतजमिनीत विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्याचा विपरीत परिणाम होऊन जमिनीतील सुपीकता नष्ट होत चालली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मातीपरीक्षण करणे अत्यावश्यक ठरत असून, चांगल्या उत्पादनासाठी देखील ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांनी दर तीन वर्षांनी एकदा न चुकता मातीपरीक्षण करून घ्यावे, या माध्यमातून जमिनीत कोणत्या घटक द्रव्यांची उणीव आहे, त्याची माहिती कळू शकते. त्यानुसार, उपाययोजना करून शेतकरी उत्पन्न वाढवू शकतात, त्यामुळे जमिनीचे नेमके आरोग्य कळण्यासाठी मातीपरीक्षण करणे गरजेचे आहे.

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची तब्येत खराब झाली आहे. ज्या जमिनीत रासायनिक खतांचा अधिक वापर झाला आहे, तिथे पिकांवर कीटक व रोगांचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असते. 

माती परीक्षण म्हणजे नेमके काय?शेतजमिनीत नेमके कोणते गुण व दोष आहेत. कोणत्या घटक द्रव्यांची आवश्यकता आहे किंवा पिकानुसार कोणत्या खताचा वापर करावा लागेल, हे जाणून घेण्यासाठी मातीपरीक्षण करणे आवश्यक आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जीवाणू नष्टअॅझोटोबॅक्टर प्रजाती मुक्त जिवंत, नायट्रोजन-फिक्सिंग जीवाणू आहेत; रायझोबियम प्रजातींच्या विरुद्ध, ते सामान्यतः वनस्पतींशी सहजीवन संबंधांशिवाय वातावरणातील आण्विक नायट्रोजनचे निराकरण करतात. मात्र, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे हे जीवाणू नष्ट होत आहेत, अशी माहिती कृषी सहायक प्रशांत काटे यांनी दिली.

किती वर्षांनी कराल माती परीक्षण?दर तीन वर्षांनी शेतजमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्यायला हवे. यामुळे जमिनीचा पोत बिघडलेला असल्यास त्यावर प्रभावी उपाययोजना करता येणे शक्य होते.

पिकांच्या वाढीसाठी हे घटक आवश्यकपिकांच्या अपेक्षित वाढीसाठी नत्र. स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्रेशियम, सल्फर, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मॅगनिज, बोरॉन, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन आदी घटक आवश्यक आहेत.

अधिक वाचा: Beej Prakriya : बीजप्रक्रियेचे चांगले रिजल्ट मिळण्यासाठी प्रक्रिया करतांना काय कराल बदल

टॅग्स :शेतीशेतकरीपीकसेंद्रिय खतखते