Join us

Madhmashi Palan Yojana : मधुमक्षिकापालकांनो मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करून घ्या अनेक योजनांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:51 IST

Madhukranti Portal मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे.

मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे.

राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व Honey Mission मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

सदर अभियानांतर्गत लघु अभियान I, लघु अभियान II व लघु अभियान III समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्यावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल विकसित केलेले आहे. या पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावयाची आहे.

मधुक्रांती पोर्टल वरील नोंदणीमुळे मधुमक्षिकापालकांना मिळणारा लाभ१) मधुमक्षिकापालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळते. (Recognition)२) नोंदणी धारकांना १ लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध होतो. (Insurance of Rs. 1 Lac)३) विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर. (Hassel Free Migration)

नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रे १) आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्तासहित)२) अद्यावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला)३) मधुमक्षिकापालना संबंधित तपशील.४) मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-200 kb पर्यंत)५) मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-100 kbपर्यंत) 

नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करता येते.

अ.क्रस्वमालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या (१० फ्रेम)भरावयाचे नोंदणी शुल्क रु.
१० ते १००२५०
१०१ ते २५०५००
२५१ ते ५००१,०००
५०१ ते १,०००२,०००
१,००१ ते २,०००१०,०००
२,००१ ते ५,०००२५,०००
५,००१ ते १०,०००१,००,०००
१०,००० पेक्षा अधिक२,००,०००

तरी मधुमक्षिका पालकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त मधुमक्षिकापालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी.  

नोंदणीकरिता वेबसाईट:  https://madhukranti.in/nbb/

अधिक माहितीसाठी संपर्क राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली - (०११) २३३२५२६५ / २३७१९०२५मधुक्रांती पोर्टल Tech Support - १८००१०२५०२६महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे - (०२०) २९७०३२२८

टॅग्स :सरकारशेतकरीसरकारी योजनाराज्य सरकारकेंद्र सरकारआधार कार्ड