Join us
Daily Top 2Weekly Top 5

Light Trap : कीड नियंत्रणासाठी फवारणी ऐवजी करा ह्या सापळ्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 14:57 IST

पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. ह्या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे.

पावसाळ्यात प्रामुख्याने अनुकूल वातावरणात किडींचा उपद्रव व प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. ह्या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. प्रकाश सापळ्यांच्या मदतीने नर व मादी यांच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यास मदत होते.

बाजारात वेगवेगळे प्रकारचे प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. प्रकाश सापळे वापरण्यात सोपे असतात सोबतच लाभदायक कीटकासाठी हानिकारक नाही आहे. सोबतच काही प्रकाश सापळे सौर उर्जेवर सुद्धा चाललात

प्रकाश सापळ्याचे महत्व१) प्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते.२) हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते.३) प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे.४) प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे. सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत.५) प्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो.

पिकांमध्ये लावण्याची पद्धती१) प्रकाश सापळे पिकाच्या मध्यभागी लावावे उदा. १ प्रकाश सापळा प्रति हेक्टर.२) पिकांपासून हे सापळे १.५ फुट उंच लावावे.३) चांगल्या परिणामासाठी संध्याकाळी ७ ते ११ या दरम्यानच्या काळात चालू ठेवावे.

प्रकाश सापळ्याची उपयोगिता१) नर व मादी हे दोन्ही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात त्यामुळे त्यांच्या मिलनाला अडथळा निर्माण होऊन येणाऱ्या नवीन पिढीला अटकाव करण्यास मदत होते.२) प्रकाश सापळ्याची रचना असा प्रकारे केली जाते कि ज्यामुळे मित्रकीटक आकर्षित जरी झाले तरी त्यांना काही हानी पोहचत नाही.३) प्रकाश सापळे हे बॅटरी वर सुद्धा चालू शकतात.४) प्रकाश सापळ्याच्या उपयोगाने हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो.

पिके आणि त्यावरील किडींचे प्रकाश सापळ्यामुळे व्यवस्थापन१) धान - खोडकिडा, पाने गुंडाळणारी, तुडतुडा, हुमणी२) कडधान्य - शेंग पोखरणारी अळी, नाकतोडा, कटवर्म२) मका - खोडकिडा४) सोयाबीन - उंटअळी व लष्करी अळी५) भाजीपाला - फळ व शेंगा पोखरणारी अळी, डायमंड बॅक मॉथ, सेमीलुपर६) ऊस - पायरिला, हुमणी, तुडतुडा, खोड पोखरणारी अळी७) भुईमुग - केसाळ अळी, फुलकिडे८) आंबा - पतंग, मोल क्रिकेट

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणपीकशेतीशेतकरी