Join us
Daily Top 2Weekly Top 5

गहू फुटवे वाढीसाठी जबरदस्त फॉर्म्युला, असे करा अन्नद्रव्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:10 IST

Wheat Crop Management : रब्बी हंगामातील गहू पीक सद्यस्थितीत फुटवे फुटण्याची अवस्थेत आहे.

Wheat Crop Management :  रब्बी हंगामातीलगहू पीक सद्यस्थितीत फुटवे फुटण्याची अवस्थेत आहे. अशावेळी अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. गहू अन्नद्रव्य व्यवस्थापनात संतुलित खतांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि योग्य वेळी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असते. गव्हाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, हे समजून घेऊयात... 

गहू अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१ ते ३० दिवसांनी) एकरी २४ किलो नत्र (५२ किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास एकरी १६ किलो नत्र (३५ किलो युरिया) द्यावा. 
  • जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत, फुटवे धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) झिंक ईडीटी, (०.२ टक्के) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
  • लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत, फुटवे धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस) लोह ईडीटी, (०.२ टक्के) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • यामुळे मुळांचा विकास आणि फुटव्यांची संख्या वाढून उत्पादन सुधारते. 
  • यासाठी माती परीक्षण आणि पिकाच्या गरजेनुसार खतांची विभागणी (पेरणीवेळी, उगवणीनंतर आणि दाणे भरताना) करणे आवश्यक आहे. 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय सेवा संशोधन केंद्र, इगतपुरी  

English
हिंदी सारांश
Web Title : Boost Wheat Yield: Nutrient Management for Optimal Growth and Tillering

Web Summary : Maximize wheat production with balanced fertilization, micronutrients, and irrigation. Apply urea at tillering, and address zinc/iron deficiencies with foliar sprays. Soil testing guides fertilizer application for enhanced root development and yield.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूपीक व्यवस्थापनरब्बी हंगाम