Join us

Bhuimug Lagvad : उन्हाळी भुईमूंगाच्या जास्त उत्पादनासाठी 'या' काळात लागवड करा, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:39 IST

Bhuimug Lagvad : जास्त उत्पादन मिळविण्यासाठी भुईमूगाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात करणे गरजेचे असते.

Bhuimug Lagvad :  खरीप हंगामाच्या (Kharif Season) तुलनेत उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन जास्त मिळते. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी भुईमूगाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात करणे गरजेचे असते. उशिरा पेरणी (Bhuimung Lagvad) केल्याने काढणीच्या वेळी पाऊस असल्यास काढणीस उशीर होतो व दाण्यांना जमिनीत कोंब फुटून मोठे नुकसान होते. 

उन्हाळी भुईमुगाची लागवड

  • टीएजी-२४, टीजी-२६, टीपीजी-४१, आयसीजीएस-११, जेएल-५०१/७७६, बी-९५  (कोयना), फुले उन्नती, फुले चैतन्य, फुले भारती या जातींची उन्हाळी लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. 
  • जातीनुसार व बियाणाच्या आकारानुसार प्रति हेक्टरी १०० ते १२० किलो बियाणे वापरावे. 
  • टोकण पद्धतीने ३० x १० सेंटीमीटर अंतरावर लागवड केल्यास २५ ते ३० टक्के बियाणे कमी लागते. 
  • प्रति किलो बियाणास ५ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेडेन्झिमची बीज प्रक्रिया करावी. 
  • लागवडीपूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून द्यावे. 
  • प्रति हेक्टरी १०० किलो डीएपी किंवा १०० किलो २०:२०:० + १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा ४० किलो युरिया + २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट खत जमिनीत पेरून द्यावे. 
  • जस्त लोह व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता निदर्शनास आली असेल तर- जस्ताच्या कमतरतेसाठी हेक्‍टरी १० किलो झिंक सल्फेट व बोरॅानच्या कमतरतेसाठी हेक्टरी ५ किलो बोरॅक्स जमिनीत मिसळावे. 

                  पिकावर अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली तर-

  • ०.५ टक्के (१० लि. पाण्यात ५० ग्रॅम) झिंक सल्फेट किंवा अमोनियम सल्फेट पिकावर फवारावे.  
  • पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी हेक्टरी ५०० किलो जिप्सम झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावे. 
  • उपलब्धतेनुसार ८ ते १० दिवसाच्या अंतराने पिकास पाणी द्यावे.

 

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ 

टॅग्स :रब्बी हंगामशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन