Unhali Tomato : उन्हाळी टोमॅटोच्या पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (Unhali Tomato Management) करण्यासाठी, माती परिक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. यामुळे मर्यादित खर्चात चांगले उत्पादन घेणे शक्य होते. म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या लेखातून उन्हाळी टोमॅटोसाठी (Tomato Crop Management) सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे व्यवस्थापन कसे करावे हे समजून घेऊया....
सेंद्रिय खते
- प्रति एकरी ८ टन शेणखत व ८० किलो निंबोळी पेंड.
- रासायनिक खते
- मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी एकरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे.
- खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
- राहिलेले निम्मे नत्र १५, २५ ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे.
- खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
- याशिवाय प्रति एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅगनीज सल्फेट, २ किलो बोरॅक्स आणि १० किलो मॅग्नेशियम सल्फेट ही सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ये लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावीत.
जैविक खते
- प्रति एकरी २ किलो अॅझोटोबॅक्टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी) व २ किलो पालाश उपलब्ध करणारे जीवाणू (के.एम.बी.) हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.
- - ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी.